Categories
Misc Poems

Marathi poem:कळपातील कण्हनं


तुज्या तोंडी दुसऱ्यांचे तर्क

तुझा शब्द,त्यांचे वर्ख

असा कसा व्यक्त होतोस..

इतक्या स्वस्तात भक्त होतोस?||1||

त्यांनी सांगीतले तू मानले

असे होते,तसे होते

असेच होत असते मग..

आणि तसेच असते जग||2||
इतके सहज कसे मानतो

कल्लोळाला सूर जाणतो?

आपले गुंडाळून ठेवून

प्रचाराला विचार म्हणतो||3||
असे आवडत असेल तर कर..

फेकतील तुझ्यावर ओळी

तेच,तसेच,पण नव्याने रोज

ती आपले म्हणून डोक्यात भर||4||
मला सांग मित्रा एक..

पण सांग, त्या आधी तुला..

वदवून घेतलेले पटेल का

आपलेसे तरी वाटेल का?||5||
तू म्हणशील तर हो म्हणेन मी

मैत्रीच्या नात्या पायी

तुझे म्हणणे,तुझेच खरेच

तू असाच ,हे पण मानेन मी..||6||
मग तू ,तू तरी कुठे उरशील

 नकळत कळपात शिरशील

काळापात कोठे शोधू मी मित्र

एकांडा वाघ .. कळपातील कण्हनं…||7||

Categories
Misc Poems

Marathi poem:दोन डब्बे

​दोन डब्बे झालेत जगाचे…

एकात तू बसला कि, दुसऱ्यात मला बसव

सोबत नसलो तुझ्या ,कि विरोधी असतो मी

वाद सोप्पे झाले आपले,मतांचा अंत झाल्याने||1||

आजकाल मोदी चे असतात डब्बे

त्याआधी केजरीवाल भोवती मंडायचो आपण

मार्क्स,समाजवादी, भांडवलवाले ..

हे बाबा आजोबांचे आवडते डब्बे जुने..पुराणे||2||

बायकोला टोमणे मारणारी नणंद ,हीच

नवऱ्याशी भावा साठी भांडणारी बहीण आपली

द्वयताचे चेंडू सहज असले रोज झेलतो आपण

काळा-गोऱ्याचा पुस्तकी हट्ट येतो रे कुठून?||3||

जिंकण्याचा घोर लागला ..की डब्बे येतात कामी

माझाच डाव,नियम,निवाडा.. सोयीची मांडणी

मुद्द्या ऐवजी, गुद्द्यां साठी जेव्हा मंडशील डाव

डोके गंजते,स्वत्व मरते,डब्बे कबरी होतात आपल्या||4||

Categories
Misc Poems

Marathi poem:बदल नोटा

​तुझ्या नोटा माझ्या नोटा

टमरेल रिकामा वापर गोटा

चेक नसेल तर डिजिटल हो

चढवून paytm चा फेटा||1||

तीनशे रुपये रोजंदारी वर

काळा झाला बघ पांढरा

तू असाच लाग रांगेत

नेसून इमानदारीचा सादरा||2||

शोध कुठे सापडतात का

घाबरलेला काळाबाजारी

दुय्यम निबंधक,आरटीओ

गुंठामंत्री अन रेतीव्यापारी||3||

लिस्ट अशी ही लांब आहे

तुझ्या मनातील काळ्यांची

सगळे कसे सुटलेत मात्र

भोके मोठी होती जाळ्यांची||4||

असा नको घाबरू मर्दा

लुच्चे होते ते अच्छे आले

हेच ते दीन,बघ बदललेत

60 टक्क्यांवर सच्चे झाले||5||

तुला तरी कोठे होती

हिम्मत जग बदलायची

आता जग बदलले तुझे

कर घाई नोटा बदलायची||6||

Categories
Misc Poems

Marathi poem:अहो विश्वम्भर

​अहो विश्वाम्भर, किती भराभर,तेच तेच बोलणार

जड मोदी च्या बरोबरीने,हलका अरविंद तोलनार

तुम्हालाही माहित आहे,नेता आहे हा खमका

एकटाच इथवर आलाय,थेट आणि नेमका
हट्टी, खंबीर, हुकूमशहा,एकाच रंगाचे शेड आहे

यातील फरक कळणार कसा,मीडिया आजकाल पेड आहे

तुम्ही करा काय तो विवेक, बनून विचारवंत

विचारधारेचा हट्ट सोडून,बोलाल काहो स्वतंत्र?
कालचे उत्तर,उद्या कदाचित,चुकीचेहि ठरेल

शाही च आहे ही,लोकांची,करेल अन मग भरेल

दरम्यान,केलेल्या निवडीची,समजून सांगा किंमत

म्हणजे नव्याने भुलण्याची कायम राहील हिम्मत

Categories
Misc Poems

Marathi poem:सोशल मीडिया

 

ह्याची ट्रिप,त्याचे मत आणि उसने नवल वारंवार

कुठे किती.. काय होते,माझे जीवन नीरस फार..!

वेळ दवडून, वेळच नसतो,भेटू कधीतरी म्हणशील

संतापाला आवतन देऊन,असा किती दिवस झुरशील?
 

बघ अजूनही ,चंद्र उगवत असेल, मंद,आकाशात

मित्रांना घेऊन,जमव मैफिल,led च्या प्रकाशात

टक्कल पडायला लागलीत,विकेट पडायच्या आधी भेट

नुसतेच हैप्पी ब्दडॆ, असे किती दिवस म्हणशील?
 

गेली ती वेळ,आणि जातंय ते जीवन तुझेच आहे

तो तुझा जिवलगा,तिकडे असाच बिझी आहे

जा त्याला भेट कडाडून,बंद कर साल्या हे नेट

गेलेला काळ तुच असतो,असा किती दिवस उरशील

 

जीवनाच्या भेगा भरायला,अधून मधून,अपडेट भक्षण

प्रत्यक्षाची भूक आभासाने?वेड्याचे नाहींका हे लक्षण

तोंडी लावायला लोक असतात का?किती खाडे करशील

सोशल असली,तरी मीडिया असते,अजून किती भुलशील?

Categories
Misc Poems

Marathi poem:भक्त झाले

​कसे काय ,ते,मग असे कसे ?

मला वाटते ,जसे तसे ,अन तसे तसे

मी वाचलेले ,वाचविलेले, तेच खरे

असे सारे आज व्यक्त झाले..

मी माझ्या असण्याचा, तू तुझ्या

त्या सोहळ्याचे गीत मोडून

संचिताचीे,मननाची,वाट सोडून

विचाराच्या जोखडातून मुक्त झाले
शोधा  संवादा साठी कुणी,तर

वादविवादावर  सारे  लुब्ध झाले

हरवलेत कुठे रे माझे सुहृद?

आपले सोडून सारे भक्त झाले

Categories
Misc Poems

marathi poem:उगवशील तू

हे बिंब आसमानी, मनी विराणी,ओठांवर ओळी विसळू कश्या मी
गाशील तू,तेच गीत नव्याने,ध्यानाचे मनी ठेवशील तू

पदरात रक्षा वागवू कशा मी,उसळून येईल धग त्यातूनही
हसशील तू,नटशील तू,नव्याने कलेवर सजवशील तू

तुझ्या डोळ्यात बिंब कोणाचे,पापण्यातील स्वप्ने आवरू कसे मी
उगवशील तू,बहरशील तू, पंख्याने स्वप्ने सुकवशील तू

माझ्या या रात्री,चंद्र दाह उराशी,पुन्हा पोर्णिमेत उजळू कसा मी
उजवशील तू,उगवशील तू,पान्हयाने निखारे विझवशील तू

Categories
Misc Poems

lokpal : मराठी कविता

कृष्णा तुझी गीता वाया गेली रे बाबा

राजनीतीने आपला पुन्हा साधला कावा ||1||

धृतराष्ट्राची मुले यंदा शेकड्याच्या पार

अजुनही भीष्म वाहतो पदाचा आपल्या भार ||2||

पांडवांना आनंद तेवढा पांचजन्य फुंकल्याचा

वीर्यात त्यांचा जोर उरला तो मेलेल्याचा ||3||

लोकशाही लाचार , उभी वर्षानुवर्षे नग्न

जनता निर्विकार , बेचारीत समाधानी-मग्न ..||4||

 

Categories
Misc Poems

Hindi Poem :दुर्गा देखो आज जनमकर

दुर्गा देखो आज जनमकर

मंदीरमे ना पूजी जाओगी

स्कूल जाते , राह चलते

चुटकीमे लुट जाओगी ||१||

भरम नजाना देख इनको

हो हरतरफ जो दंगे है

सुबह चायपे “माल” ताडेगे ये

जेहेन इनसबके नंगे है ||२||

तुम “लकी” थी माता बन गयी

अब मां का ये हाल है

“मातर” के पेहले वंदे नही

अब “चो” ”चू” केहना आम है ||३||

तुम भी अपना ध्यान रखना

वक़्त बडा खराब है

“चेक” कर लेना अबसे दर्शनमे

भक्त कि कहा निगाह है ||४||

Categories
Misc Poems

Marathi Poem : काळ प्रसवला

काळ प्रसवला भिंतीमाधुनी
उमलले एक रोप
हृदयाकारी पाने इवली
नाजूक अन निकोप ||1||

खडकांमध्ये थरार त्याच्या
आश्वस्त स्थितप्रध्य्नेचा
आता सरली भीती माझी
असतील काळीजही भिंतींना ||2||

~ मूळ इंग्रजी कविता ऋता पराडकर ह्यांची . अनुवाद सचिन दिक्षित .
contact ruta at https://www.facebook.com/profile.php?id=1646107526

The ancient wall cracked…

And then emerged,

A heart-shaped leaf…

So soft, so gentle…

But rooted in its convictions…

Held strong in the boulders…

It amazed me…

Walls don’t scare me anymore…

They might even have a heart…