Marathi poem:मी लाभार्थी

पूसलेलं मळवट,मोडलेला कणा दारिद्रीची रेघ,पायातील भेग पोटाची आग,नशिबावर राग म्हणतात काय, मी लाभार्थी 1 रिकामे हांडे,थकलेल्या माना औषधांची वणवण,तापाची कणकण सुकलेला तान्हा,बरगडीच्या खुणा म्हणतात काय, मी लाभार्थी 2 गर्दीचा रेटा,मरणाचे पूल टोलचा सोटा,मेट्रोची झुल झिजलेले मणके, बसलेले दणके म्हणतात काय, मी लाभार्थी 3 कोठडीतील ठेचा,मामाची लाच भेदरलेली भाईन,घाबरलेली माय स्पर्शाचा धाक ,कोपर्डीची हाक म्हणतात काय, […]

Hindi poem : अरे कान्हा

अरे कान्हा फिर ना आना तुम जमुना के तट पे ना दवा मिलेगी ना हवा मिलेगी नाथोके शकटमे।1। कालिंदी काली और गंदि है .. नमामी की प्रतीक्षा मे ग्वाले पल्लू खीच रहे,जोगीयो के दीक्षा मे ।2। तेरा अर्जुन फेसबुक पे,महिमामांडन मे मस्त है संजयो का राज यंहा, सब प्राइम टाइम मे व्यस्त है।3। किसे सुनाओगे […]

Marathi poem:दोन नोटातरी द्या मज बदलूनि

नवी कविता : दोन नोटातरी द्या मज बदलूनि _____________________ दोन नोटातरी द्या मज बदलूनि कामाविल्या ज्या मी स्वकष्टाने मोडून टाकली सारी वचने मोदी च्या त्या टांकसाळीने अशी ब्यांकतरी द्या मजगावी जुन्या घेऊ ह्या मी बदलूनी काउंटरी किवा एटीयमी ठेवा पडेना सोस एवढ्या नोटा साहेब अठवा आणाभाका सगळाच गेला धंदा बसुनी दोन नोटातरी द्या मज बदलूनि […]

Marathi poem:अरे हो धर्म

​अरे हो,धर्म..नाही का.. आकाशातून आला..होता कोणी माणसाच्या भल्या साठी.. जीवनाचे सार सांगितले.. रोजचे व्यवहार सांगितले सांगितले माणसांवर प्रेमकरा सगळ्यांवर सेम करा.. अश्या छान छान गोष्टी होत्या महान ..महान व्यक्ती होत्या धर्मच तो चुकणार.. कसा? तुझा म्हटल्यावर झुकणार कसा.. त्या धर्मात पटतो कारे मी? माझा मी ,सगळा असतो,म्हणून विचारले माणूस म्हणून दिसतो का मी? काही,वेगळा आहे […]

Marathi poem:तुझी जात,माझी जात

​एक जात तुझी,एक जात माझी एक लाथ तुझी एक लाथ माझी।।1।। एकजात नव्हतो,एकसाथ असून एक बात तुझी,एक बात माझी।।2।। गळाभेट करून,गळा कापाकापी एक चाल तुझी,एक चाल माझी।।3।। सर्वसमभाव,भावकीलाच पाव एक मोट तुझी,एक मोट माझी।।4।। तुझी जागा पक्की,माझीही नक्की एक वाट तुझी,एक वाट माझी।।5।। एकोप्याच्या गाप्पा, दोघेही मारू एक रात तुझी,एक रात माझी।।6।। दोघेहि महान,दोघेही समान.. […]

Marathi poem:शरीर विकतो आम्ही

​शरीर विकतोय आम्ही थंड एसी मध्ये बसून.. कीबोर्ड वर बोटे.. खुर्चीत बसून मान..।।1।। बॉस सोबत मिटिंग ला त्यांनी म्हटलं बस.. कि लगेच वाकतो . कणे पण विकतो आम्ही..।।2।। इंनोवेशन करतो आम्ही जग बदलायला.. भल्यासाठी भ्रमात राहायला..नोटासाठी डोके पण विकतो आम्ही..।।3।। 2bhk च्या कुंटनखाण्यात स्वतःचीच दलाली खातो स्वप्नांचे भोग देऊन रोज… आत्मा पण विकतो आम्ही।।4।।

Marathi poem:कोमेजले जिव्हाळे

​पुरवू कसे डोहाळे, उबदार हिवाळ्याचे कोमेजले जिव्हाळे,धुमसून वात गेली…1 तू गात होतीस तिकडे, किशोरीचे ताराने व्हाट्सअँप पायी,विसुरन बात गेली..2 बंगला सोन्याचा हा,बांधला तुझ्याच साठी अडवे झालो आपण,निद्रेची साथ गेली..3 ठेवले तुझ्या पायी,जग जिंकून सारे सुखाच्या हिशेबात,सगळीच रात गेली..4 उरलो कितीसे आपण,झुरता साथि साठी हे कोण अनोळखी,सोडून कात गेली..5 टीप:2 मध्ये wahtsapp पायी ऐवजी गुंतलो माझ्यात […]

Marathi poem:कळपातील कण्हनं

​ तुज्या तोंडी दुसऱ्यांचे तर्क तुझा शब्द,त्यांचे वर्ख असा कसा व्यक्त होतोस.. इतक्या स्वस्तात भक्त होतोस?||1|| त्यांनी सांगीतले तू मानले असे होते,तसे होते असेच होत असते मग.. आणि तसेच असते जग||2|| इतके सहज कसे मानतो कल्लोळाला सूर जाणतो? आपले गुंडाळून ठेवून प्रचाराला विचार म्हणतो||3|| असे आवडत असेल तर कर.. फेकतील तुझ्यावर ओळी तेच,तसेच,पण नव्याने रोज […]

Marathi poem:दोन डब्बे

​दोन डब्बे झालेत जगाचे… एकात तू बसला कि, दुसऱ्यात मला बसव सोबत नसलो तुझ्या ,कि विरोधी असतो मी वाद सोप्पे झाले आपले,मतांचा अंत झाल्याने||1|| आजकाल मोदी चे असतात डब्बे त्याआधी केजरीवाल भोवती मंडायचो आपण मार्क्स,समाजवादी, भांडवलवाले .. हे बाबा आजोबांचे आवडते डब्बे जुने..पुराणे||2|| बायकोला टोमणे मारणारी नणंद ,हीच नवऱ्याशी भावा साठी भांडणारी बहीण आपली द्वयताचे […]

Marathi poem:बदल नोटा

​तुझ्या नोटा माझ्या नोटा टमरेल रिकामा वापर गोटा चेक नसेल तर डिजिटल हो चढवून paytm चा फेटा||1|| तीनशे रुपये रोजंदारी वर काळा झाला बघ पांढरा तू असाच लाग रांगेत नेसून इमानदारीचा सादरा||2|| शोध कुठे सापडतात का घाबरलेला काळाबाजारी दुय्यम निबंधक,आरटीओ गुंठामंत्री अन रेतीव्यापारी||3|| लिस्ट अशी ही लांब आहे तुझ्या मनातील काळ्यांची सगळे कसे सुटलेत मात्र […]