Categories
Marathi Misc

Marathi Satire:mumbai bullet train wins UN award

जगातील सर्वोच 6 बुलेट ट्रेन प्रकल्पात मुंबई-आमदावाद बुलेट चा समावेश ! भारतात सर्वत्र जल्लोष!!
(UTI) आत्ताच प्राप्त झालेला वृत्ता नुसार, युनायटेड मोनिटारी बँकेने जाहीर केलेल्या जगातील 6 सर्वोत्तम बुलेट ट्रेन प्रकल्पात भारतातील मुंबई बुलेट प्रकल्पाचा समावेश झालेला आहे.जगातील सगळ्या बुलेट ट्रेन प्रकल्पची यादी करून बँकेने ही यादी जाहीर केलेली आहे.ह्याप्रसंगी बँकेचे प्रमुख गो टू मून म्हणाले “जागतिक पातळीवर विविध देशातील बुलेट प्रकल्पात उत्कृष्ठतेसाठी बंधुभावाने स्पर्धा निर्माण व्हावी ह्यासाठी आम्हि ही यादी तयार केली आहे”. ह्यात जगातील नावाजलेले शिंकनशेंन,जर्मन भान,शघाई मागलेव्ही इत्यादी प्रकल्पात भारतातील मुंबई बुलेट प्रकल्प सहाव्या क्रमांकावर आलेला आहे.
बुलेट ट्रेनची गती,सोयी सुधीवा,तंत्रकौशल्य,वक्तशीरपणा आणि भाडे इत्यादी निकषांवर आधारित गुंतालिका बनवून ही यादी तयार केली आहे.ह्यात सर्वसमावेशकता हे तत्व वापरून पहिल्यांदाचा ग्रीनफिल्ड म्हणजे होऊ घातलेले, अशी एक नवीन श्रेणीतील, एकमेव जागा भारतातील मुंबई ते आमदावाद ह्या विचार अधीन प्रकल्पाने पटकावली.
त्यामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.ह्याप्रसंगी मुबई बुलेट ट्रेन चे व्यवस्थापक सचिन दीक्षित म्हणाले,आमच्या प्रकल्पाचे सद्यास केवळ कुदळ फावडा झाले असले तरी एकंदरीत भु-सम-पांदण, आमदावाद हे श्रीमंत शहर धरावी असलेल्या शहराशी जोडणायची दूरदृष्टी, ह्यात शून्य व्याजावर मिळालेलं जपानी कर्ज इत्यादी प्रस्तावित बाबी आमच्या पदरात हा सन्मान पडण्यास कारणीभूत झाल्या.सोबत मुद्दाम पर्यावरण विषयक म्हणून जे काही कल्पक नियोजन आम्ही करणार आहोत ते नियोजन बघून बँक विशेष खुश झाली.ह्या बुलेट ट्रेनच्या चाकातून निर्माण होणारी उष्मा वापरून आम्ही मार्गातील खारे पाणी उकळून त्यातून मीठ आणि मिनरल वाटर तयार करणार आहोत.सोबत मार्गातील मॅनग्रुव च्या खारफुटीत आम्ही काजव्यांची विशेष शेती करणार आहोत, त्यामुळे सह्यादरीतील काजव्यांची सहल आणि त्यामुळे होणारे निसर्ग ह्रास कमी होईल आणि पुण्यातील निसर्ग प्रेमी खुश होतील.सोबतच बुलेट चे इंटिरियर आम्ही वारली पॅटर्न वर करणार आहोत.गेल्या 600 वर्षात आदिवासींना असे त्रिबूट कुठल्याही प्रकल्पने दिलेले नाही.ह्याच मूळे आमचा प्रकल्प ह्या यादीतील सार्थ विजेता ठरतो.
ह्या घटनेवर आम जनतेची ,आमच्या प्रतिनिधीने जी प्रतिक्रिया घेतली त्या प्रतिक्रिये नुसार लोकांत उत्साहाची एक मस्त लकेर पसरलेली आहे.जागोजागी खादीचे फ्लेक्स उभारले गेले आहेत.त्यात विविध राजकीय पक्ष आपले श्रेय अधोरेखित करीत आहेत.एक पक्षाने तर वसई-विरार खाडीत जगातील सर्वात मोठा खादीचा खाडी फ्लेक्स बनवून त्यावर “करायच्या आधीच दाखवून दिले” असा संदेश दिला आहे.ह्या घटनेची प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटली असून, “माझ्या स्वप्नांत बुलेट ट्रेनची सफर” हे सगळ्यात ट्रेंडिंग फॉरवर्ड ठरलेलं आहे(त्यास पटकन युनो चा पुरस्कार मिळो).
निसर्ग जगतात सुद्धा आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे.त्यामुळे मुंबईतील कोसळधार पाउस आता आपली सामाजिक बांधिलकी समजून सोलापूर ला शिफ्ट झालाय आणि ह्या घटनेला सॉलिडयारीती म्हणून भुसावळ च्या रेल पटारींनी पुढच्या 24 तासासाठी राग (माल)त खडखडाट करायचे ठरवले आहे.एकंदरीत ही घटना भारतासाठी भूषण आहे असे आमचे महान नेते रमता जोगी आज ट्विटर के साथ कार्यक्रमात म्हणाले.इतके अच्छे दिन आल्यामुळे मात्र सगळे विरोधी पक्ष हे खूप दीन झालेत हे मात्र नक्की.

One reply on “Marathi Satire:mumbai bullet train wins UN award”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.