पूसलेलं मळवट,मोडलेला कणा
दारिद्रीची रेघ,पायातील भेग
पोटाची आग,नशिबावर राग
म्हणतात काय, मी लाभार्थी 1
रिकामे हांडे,थकलेल्या माना
औषधांची वणवण,तापाची कणकण
सुकलेला तान्हा,बरगडीच्या खुणा
म्हणतात काय, मी लाभार्थी 2
गर्दीचा रेटा,मरणाचे पूल
टोलचा सोटा,मेट्रोची झुल
झिजलेले मणके, बसलेले दणके
म्हणतात काय, मी लाभार्थी 3
कोठडीतील ठेचा,मामाची लाच
भेदरलेली भाईन,घाबरलेली माय
स्पर्शाचा धाक ,कोपर्डीची हाक
म्हणतात काय, मी लाभार्थी 4
मुद्यांचे ढोल,जाहिरातीचा बहर
साहेबाची मुलाखत,स्पिन डॉक्टर
टीव्ही वर वक्ते,व्हाट्सअप्प प्रवक्ते
म्हणतात काय, मी लाभार्थी 5