Hindi poem: ein chikhonse

इन चीखो से, लुटती बेटीओके
चुभती तेरी ये खामोशी है
तुमभी तो खुदा बन बैठे हो ना
कुछ राज धरम को निभा दो बस|1|

एक किसन का किस्सा सुनते थे
जो लाज बचाने आया था
सुना है तेरी नजर में लेकिन
मौतोके रंग अलग अलग है|2|

इन खामोश सिसकती आहो में
तुम जोदड़ो अपनी आह ‘यासीन’
इन्ही टपकती बूंदो से फिर,
कही कोई पत्थर पिघल जाएगा|3|

तुम पहले नही हो आझम
ये निव जीसकी हिल गयी हैं
बेआबरू हुई नारी ने
हर दौर मे तख्त पलटे है |4|

Marathi Letter:आयटी इंजिनियर चे पालकांना न लिहिलेले पत्र

“तू आनंदी का दिसत नाहीस?” – IT मधील नवा प्रश्न, साधारण 28 च्या आसपासचा मुलगा,त्याला IT किंवा तश्याच प्रकारच्या क्षेत्रातील बायको,एखादी परदेशवारी झालेली,कदाचित फ्लॅट बुक केलेला आणि कार पण.ही बहुतेक एकुलती किंवा भाऊ-बहीण एवढाच संसार असलेली मध्यमवर्गीय पोरं.कधीतरी ,पोरगा सेट झाला असे म्हणत म्हणत आईबाबानां काहीतरी चुकल्याचे कळायला लागते आणि शेवटी हा प्रश्न विचारला जातो, तू आनंदी असल्यासारखा का वाटत नाही,सतत तणाव वैगरे.
जिल्ह्या,तालुक्यातून आपला मुलगा इंजिनरिंग किंवा mca करून छान It ला लागला आणि आता लग्न सुद्धा झालेले म्हणून कर्तव्य पूर्ती चे सर्टिफिकेट घेताना हे असे काही नवेच समोर येईल अशी शक्यता त्यांचा गावी नसते.व्यसन किंवा लग्नातील विसंवाद नाहीये हे त्यांना पालक म्हणून कळलेले असते. त्या काकांच्या मुलाला 2008 साली काढले तसे काही आहे का?तुला काम जमत/आवडत नाही का पासून ते बॉस त्रास देतो का,आमची चिंता नको करू पर्यंत सगळे विचारून झालेले असते.त्यात कहर म्हणजे कधी नौकरी वगैरे गेली तर आम्ही सांभाळून घेऊ सुद्धा म्हणून झालेले असते.आणि त्यावेळी आपले नेमके काय विचकलेले आहे हे त्यांना कधीही न सांगण्याचा त्या मुलाचा विचार पक्का झालेला असतो.
ह्या सगळ्या प्रकाराची सुरवात होते ती मुलाने संसार थाटायला सुरवात केली तेव्हा पासून.गरिबीतून घर वर काढले किंवा परिसरात नाव काढले असे माझ्या म्हणजे 2000 च्या आसपास डिग्री झालेला पिढीला असलेले आंतरिक बळ ह्या नवीन पिढीकडे नसते.साधारण लीड पदाला असल्याने ,शर्थ केली तरी इतक्या फास्ट बदलणाऱ्या तंत्र जगात आपण नेहमीच रेलवंट,आचिवर राहूच असे नाही हे कळून चुकले असते .आपण पुण्याच्या किंवा कुठल्या शाहरील दूरच्या उपनगरातील आनेक्स मध्ये घेतलेला फ्लॅट आपल्याला सहज परवडलेला नाही.तसा तो फ्लॅटपण काही खास नाही.आणि आपले घर जसे होते त्याच्या जवळपास सुद्धा तो येत नाही.हे सत्य हळूहळू,एखाद्या काटा रोज थोडा थोडा खोल रुतत जावा तसे उमगलेले असते.त्यात मग मुलाचे कौतुक करायला म्हणून रिसोडहुन मुद्दाम आलेले आजी किंवा आई ह्या फ्लॅट चे दार दिवसभर उघडे ठेवते.पण तरी कोणी येताजाता ‘काय चालले” म्हणून विचारत नाही,नसतेच कुणी,सगळे संध्याकाळी पार्क मध्ये भेटणार असतात.हे तिला जाणवून… पण त्याला जाणवू नये म्हणून ..
काहीतरी कारण काढून ..पटकन गावी परत जाणारी आजी/आई गेली की तो फ्लॅट मुलाच्या मनातून उतरतो.प्रश्न किंमत,अंतर किंवा आकाराचा नसतो.शेजाराचा तर नासतोच नसतो.आपल्या नकळत, विचारात नसताना सुद्धा, घर म्हणून आपले काहीतरी मोघम पण निश्चित असे आराखडे होते हे त्याला अचानक कळलेले असते. ह्यात मग संसार किंवा जीवन म्हणून सुद्धा आपले काही आराखडे होते हे त्यादिवशी कळले तेव्हा मुलगा माणूस झालेला असला तरी भावनिक दृष्टया फासलेला असतो. ठरवून न निवडलेले जीवन आणि माहीत नसलेली आवड ह्यात. कुणी IIM किंवा ग्रीन कार्ड च्या मागे लागलेला असला की तो ह्यातून सुटतो,काही वर्षांसाठी. मुळात एक दोन भावंडं असलेली ही पिढी,लाडकी असली तरी खूप हळवी असतात.आपले छोटे घर,आई-बाबा,शेजार-शाळा ह्यांच्या बद्दल त्यांच्या भावना इतक्या खोलवर असतील ह्याचा अंदाज माझ्या 80 च्या पिढीला जरासा आलेला असला तरी त्यांच्या पालक असलेला 60, 70च्या पिढीला आलेला असतोच असा नाही.घरी फार काही आर्थिक पीळ नसला तर 50 हजार ते लाख भरात पगार असला तरी त्यात “अर्थ” नसतो.तिकडे आई-बाबा मात्र “मस्त एन्जॉय करा बरका” असे ,आपले अपुरे स्वप्न आपले मूल जगतंय म्हणून खुश होतात.कधीतरी फोन करून मुलगा विषय काढतो,हळूच.गावात काही व्यापार असेल तर तिकडे जॉईन करू शकतो मी !किंवा आपल्याकडे काही साधा जॉब असता तर बरे झाले असते नाही?ह्याला इकडे करमत नसते…..
हे बोलताना बरेचदा रागावलेले बायको दिसली तरी तिला नजरंदाज करण्याची हिंमत त्याने केलेली असते.पण बाबाला काही ह्याचे मन समजत नाही.
माझे आता वय म्हणून झालेलं असल्याने साधारण महिन्याला एक तरी कुणी असा विषय घेऊन येतो. “आम्ही येथे खूप काही ग्रेट करत नाही हो,त्यापेक्षा तुमच्या सोबत/जवळ असतो तर बरे होते” हे असे संगायला जमत नाही.लायकीचे ओझे म्हणतात ते हे.
त्यात काही मुलाच्या पालकांना वेळेत अंदाज आला…. तर काहींनी स्पष्ट विषय काढला.बहुतेक पोरं घरी काहीतरी व्यापार,धंदा किंवा स्वतःच काही नेमका प्लॅन असलेले आहेत. आणि सुखी आहेत.फॅक्टरी,स्विमिंग पूल-जिम,ट्युशन,तिकडेच स्टार्टअप ते दुकान/प्रतिष्ठानाचा शाखा विस्तार असे विविध प्रकार केलेत.बायकोची साथ होती मात्र !
ज्यांना हे जमले नाही ते पण सुखीच आहेत पण संधीची वाट बघताहेत. ह्यात मुलींना फारसा चॉईस नसतो,तरी एक म्हणालीच “सर,मला वाटते काही मोठी मंदी, युद्ध व्हावे आणि परत जाता यावे”. हे असे सगळयांचे होते असे माझे म्हणणे नाही,पण हे असे असू शकते ,आपली मुल पैश्यापेक्षा भावनिक स्थिरता,अर्थ असे काही शोधू शकतात आणि त्याला कदाचित हे मांडता येत नाहीत हे पालकांना माहीत पाहिजे.नाहीतरी तुझाकडे सगळे असून आनंदी का दिसत नाहीस ? हा प्रश्न असह्य होऊन अगदी 100 टक्के अस्सल वाटेल असे उत्तर पण वाठवायला शिकेन तो.आता 22 ला असलेली पिढी ते शिकूनच येतेय.त्यांना घर किंवा कार घायचीच नाहीये,एका कंपनीत फार काळ टिकण्या पेक्षा पटापट पैसे घेऊन आपले काही सुरू करणायचे मनसुबे घेऊन आलेले हे फ्रेशर कदाचित जास्त सुखी असतील.पण निव्वळ गरिबीतून आलेलो मी/आम्ही आणि अस्थिरतेवर आरूढ ही नवी फ्रेशर पिढी ह्यामधील संक्रमण काळातील ,आता तिशीला जाणारी पिढी मात्र फसलेली दिसते.मला आवडलेले लहानपण आणि मला पाहिजे असलेले भविष्य हे ह्या इंजिनियर,IT नौकरित नाहीये हे आपल्या पालकांना सांगा रे बाबांनो.अशी घुसमट होत असले तर बोला.नाहीतर हा मेसेज आपल्या काका,मामांना पाठवा ते पोचवतील तुमच्या आई-बाबा पर्यंत.
तुमचा,
दीक्षित दादा.

Hindi poem : काफिर यार

कव्वाली होगायी किसी औरकी
मैं अपने साथ ये एक खयाल ले बैठा हूं
कानोमे घुले अमरीत फिरसे
कोई सुरोंसे ये रंग हटा दे|1|

मैं चाटता था उंगलीसे खीर
उसे शिरखुरमा केहने की जिद कर बैठा है कोई
ये कंकर चुभता बडा है
कोई जुबान का सुवाद लौटा दे|2|

तेरी कुरतेसे चूरया करते थे सिक्के
ये अमिरी बचपनकी हुआ करता थी “यासिन”
जेबे गिनके मिलने लगे है सिने ईदपर
कॊई ऊन सिने मे फिर दिल धडका दे|3|

तेरे आंगनमें भरती मेहफिल
मेरी कविता,तेरे शेरों की वॊ सिलसिले
अब मोदी-ओवेसी बकने लगे है हम
कोई अंखोसे ये किल निकाल दे|4|

मुझे केहने लगे है काफिर आजकल
ऊनही मुस्लीमो मे जान अटकी पडी है कहीं
सख्ती से नमाजी बन बैठा वहा
कोई उसमेसे मेरा यार लौटादे |5|

Marathi poem:भेगा महाग पडतात

भेगा महाग पडतात
चिरलेल्या मातीच्या रेघा ..महाग पडतात
कुणाचाही असो झेंडा..हातात..
त्या हातावर सुकलेले भविष्य
सुरकूतलेले हसू.. फाटलेल्या ओठावरचे
डांबरी रस्त्यावरील अनवाणी पाय..
कपाळात टोचणारे चांभारी खिळे..
फाटक्या सदऱ्यावाला बाप..उघड्या पाठीचा
तुमच्या दरी येऊन जेव्हा भीक मांगतो
आपल्या पोरांसाठी,वाळक्या ढोरासाठी
पोसणाऱ्या मायेनं, पुन्हा उजवाव म्हणून
पाणी मागतो,आशेचं ,गढूळ का होईना
तेच्यावर तुमचा बिसलेरी,आरओ..महाग पडतो
गालावर सुकेलेल्या असवाचे थेंब..
नजरेत मेलेले कोंब..
तुम्ही कीतीही प्याकेट दिले अन्नाचे तरी..
देणाऱ्या हाती,घेन्याचे दैव..
एकटेपणाची झोम्ब.. भुकेल्या पोटी..लै महाग पडते
महाग पडते ही निवडणूक..मतांची नाही
प्रेतांची..माणसाच्या हिमतींची..
खंद्यायवर वाहलेली..हजारो माढ्यांची जत्रा..
तुमच्या लोकलच्या बाजूने जाणारी ही लोकं
लुगड्याला पडलेली ही भोकं..
रस्त्यावर उतरलेली माही माय..महाग पडते..
खूप महाग पडते…
रस्त्यावर उतरलेली माही बुढी माय..

Marathi poem:मी लाभार्थी

पूसलेलं मळवट,मोडलेला कणा
दारिद्रीची रेघ,पायातील भेग
पोटाची आग,नशिबावर राग
म्हणतात काय, मी लाभार्थी 1

रिकामे हांडे,थकलेल्या माना
औषधांची वणवण,तापाची कणकण
सुकलेला तान्हा,बरगडीच्या खुणा
म्हणतात काय, मी लाभार्थी 2

गर्दीचा रेटा,मरणाचे पूल
टोलचा सोटा,मेट्रोची झुल
झिजलेले मणके, बसलेले दणके
म्हणतात काय, मी लाभार्थी 3

कोठडीतील ठेचा,मामाची लाच
भेदरलेली भाईन,घाबरलेली माय
स्पर्शाचा धाक ,कोपर्डीची हाक
म्हणतात काय, मी लाभार्थी 4

मुद्यांचे ढोल,जाहिरातीचा बहर
साहेबाची मुलाखत,स्पिन डॉक्टर
टीव्ही वर वक्ते,व्हाट्सअप्प प्रवक्ते
म्हणतात काय, मी लाभार्थी 5

Hindi poem : अरे कान्हा

अरे कान्हा फिर ना आना तुम जमुना के तट पे

ना दवा मिलेगी ना हवा मिलेगी नाथोके शकटमे।1।

कालिंदी काली और गंदि है .. नमामी की प्रतीक्षा मे

ग्वाले पल्लू खीच रहे,जोगीयो के दीक्षा मे ।2।

तेरा अर्जुन फेसबुक पे,महिमामांडन मे मस्त है

संजयो का राज यंहा, सब प्राइम टाइम मे व्यस्त है।3।

किसे सुनाओगे गीता और कौन मारोगे कंस

यादव,कौरव और कर्ण का एकहि हुआ है वंश।4।

रासका करो खुलासा,तुमसे ही मिलने सब क्यों आई?

देश जानना चाहता है,पहले उसकी दो सफाई ।5।

सत्य -मिथ्या की लग्न में ऐसी पनपी है संतान

अकर्म का ,ना धर्म,न युद्ध,क्यों लोगे अवतार ।6।

Marathi poem:दोन नोटातरी द्या मज बदलूनि

नवी कविता : दोन नोटातरी द्या मज बदलूनि
_____________________
दोन नोटातरी द्या मज बदलूनि
कामाविल्या ज्या मी स्वकष्टाने
मोडून टाकली सारी वचने
मोदी च्या त्या टांकसाळीने
अशी ब्यांकतरी द्या मजगावी
जुन्या घेऊ ह्या मी बदलूनी
काउंटरी किवा एटीयमी ठेवा
पडेना सोस एवढ्या नोटा
साहेब अठवा आणाभाका
सगळाच गेला धंदा बसुनी
दोन नोटातरी द्या मज बदलूनि
बंदिकाल हा अल्हड स्त्रीसम
मांजरीचे लोणी माकडास वाटा
निजनवीन नियमांच्या पाट्या
काढुनी का लाविता मजघोडा
काळा संपेल कसा सांगातर,का पेटीयमवर?
मित्रांनो नोटा बदलारे
कॅशलेस चा सोस करारे
देशभक्तीची अट टाका रे
लंगोटी कासेची सोडा रे

____________
केशवसुत ह्यांची मूळ कविता : एक तुतारी द्या मज आणुनी

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समते चा ध्वज उंच धारा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर

साधे प्रश्न:नोट बंदी

​नोटा बंदी वर सगळे वाचून,बोलून झाले असेल तर हे वाचा….
तर,सरकार ला काळा पैसा संपवायचा होता.जमले तर काळी संपत्ती पण संपवायची होती.सरकारला खरेच हे असेच करायचे होते का?झालेे का ?वगैरे बोलून झालें असेलच.अशी कृती करण्याचा ह्या सरकारचा तो हक्क आहे, हे समजून आपण बरेच वाद स्थगित करू शकतो.त्याचे बरे वाईट काय ते काळ बघेलच.
प्रश्न आहे तो आपल्या कृती चा,समजे चा.काळा पैसा हा काळा असतो तो त्याच्या नैतिकते मुळे. म्हणजे सरकार दरबारी त्याची डायरेक्ट नोंद नसते .मग त्यावर टॅक्स पण मिळत नाही,म्हणून काळा. हे काळा पैसे जमावणारे अतिरेकी वगैरे असतात ,हे terrorism चे KG1 स्वरूप होईल,असो.मग?..सरकारी भाषेत हे लोक भ्रष्टचारी असतात.हो सरकार लोकांवर खर्च करू शकणारा पैसे हे लोक दाबून ठेवतात,टॅक्स देत नाही त्यावर.कमी टॅक्स मुळे जनतेचं कमी प्रमाणात भले होते.चूकचे आहे ते,….मी हे अगदी सध्या भाषेत मांडले . टॅक्स नाही आला तर सरकार खर्च कसा करणार,लोकशाहीची रचना तशीच असते.लोकांनी टॅक्स देऊन थोडा त्रास सहन करायचा आणि सरकार तो टॅक्स इतर जागी त्यांच्या भल्या साठी वापरून त्याची भरपाई करेल.

मग मला सांगा,सरकारने काळा पैसा संपवला ते बरे केले,हे ठीक,आपण ते समजून घेतले ते पण ठीक .पण ते त्यांचे आणि आपले कर्तव्य नाही का? 

इथे देशभक्तीचा काय संबंध?तुम्ही कितीही त्रास सहन करून ब्यांकेच्या रांगेत लागला असला तरी ते कर्तव्य पूर्ण केले असेच आहे ,नागरिक म्हणून .त्याग आणि भक्ती ह्याला जागा नाही ह्या कार्यक्रमात.फारतर काळ्या पैसे वाल्यांची कशी ठेचली हा आनंद साजरा करू शकतो आपण,खरे खोटे देव जाणो.

चला मग,टॅक्स चोरीचा पैसे परत आला,काय तो थोडा जास्त असेल,पण आला,सदाचारी लोकांची अधिक भले करेल सरकार . मग टॅक्स म्हणून जो पैसे आजपर्यंत येत होता,येत आहे,त्याचे काय? हा पैसा ह्या परत आलेल्या काळ्या पैश्या पेक्षा जास्त आहे,असतो. त्याने लोकांचं मस्त भलं होतंय असे मानतो का आपण.देश चालतो कि नाही असे विचारत नाही मी,तो चालतोय,नाही तर लोक रस्त्यावर उतरून क्रांती करतात.भलं होतंय का? ते विचारतोय.. व्हायला पाहिजे तसे आणि तेवढे भले होते आहे का?

तुमचा सरकारी व्यवस्थे बद्दल चा अनुभव काय म्हणतो? तोच कॉमन मॅन ला येतो ,तोच अनुभव …

म्हणजे ब्यांकेच्या रांगेत लागून,paytm चा प्रचार करून,सरकार बरोबर(च) कसे आहे(च) सांगताना आपण तो देशभक्ती चा जो जोर दाखवतो,त्याला साजेल असा अनुभव असलेली व्यवस्था देते का?

मग हा नोटा मुळे आलेला,नागरिकशास्त्राचा जोर,तिथे वापरता येईल का? म्हणजे तलाठी ऑफिसात,rto, घर खरेदी आणि हो टोल नाके. एकवेळ तुम्ही एकटे हे  करतहि असाल.बरेच लोक ऍक्टिव्ह आहेत आजकाल.पण ही संख्या आणि ब्यांकेच्या रांगेत लागून देशभक्ती होते हे फॉरवर्ड करून संगणाऱ्यांची संख्या, जुळते का हो?

नाहीच जुळत,खूप मोटठी तफावत आहे.

उगाच मोदी मधात आणू नका,सरकार ला हा हक्क-संधी आहे हे आपण आधीच मान्य केले.

प्रश्न आहे तो,आपल्या नागरिक जबाबदारी आणि देशभक्ती च्या कल्पना उथळ आहेत का ह्याचा? का सहजपणे खेळवले जातोय आपण?

Marathi poem:अरे हो धर्म

​अरे हो,धर्म..नाही का..

आकाशातून आला..होता कोणी

माणसाच्या भल्या साठी..

जीवनाचे सार सांगितले..

रोजचे व्यवहार सांगितले

सांगितले माणसांवर प्रेमकरा

सगळ्यांवर सेम करा..

अश्या छान छान गोष्टी होत्या

महान ..महान व्यक्ती होत्या

धर्मच तो चुकणार.. कसा?

तुझा म्हटल्यावर झुकणार कसा..

त्या धर्मात पटतो कारे मी?

माझा मी ,सगळा असतो,म्हणून विचारले

माणूस म्हणून दिसतो का मी?

काही,वेगळा आहे ,म्हणून विचारले

तुज्या धर्मात असते का

माझ्या धर्मासाहित माझी किंमत..

पटले नाही तर बदलायची

परवडते का रे हिम्मत….

बघ बाबा विचार कर..

तुझ्या जन्मापासूनचा हा धर्म आहे

मी बोललो म्हणून भटकू नको

तुज्या असण्याचा तो मर्म आहे..

शेवटी आकाशातून आला होता कुणी

तुझ्या माझ्या भल्या साठी

त्यांनी सांगितलेले, जे तुला सांगितले आहे

बरोबरच असणार ते,आपल्या भल्यासाठी

प्रश्न पडला म्हणून,धर्म पडताळायचा नसतो

आपण समजून घ्यायचेे,वर्म चाळायचा नसतो