देव
सांडला सांडला ,देव सांडला सांडला
देवाघरचा उचलून आता बाजरी मांडला ||1||
देवाचा पराक्रम भारी ,देव भक्तांचा प्यारा
नैवेद्या लाथी मारून का चरतोस चारा ? ||2||
देवा चे उंची थोर, मनगटी भारी जोर
भक्तांना दूर सोडून देव गळी लावी चोर ||3||
देव झाला का व्यवहारी, देवा तू का रे व्यापारी
सोडून ध्यानसाधना अगा झाला व्यभिचारी ! ||4||
देव भागतान पोसला , तेना जपणे तू शिक
नकोरे हे देवपण … असे कवडीमोल वीक ||5||
देवा देवपण आगळे, दैवात्वाचे रच सोहळे
वेळ आलीयासी भारी ,जप आपले सोवळे||6||