Categories
Marathi Misc Write Ups and Downs

Marathi review: Everything is fucked by Mark Manson

Mark manson आणि गीता.Mark manson ह्याचे पाहिले पुस्तक जबर हिट झाले. Subtle art of not giving a fuck, मध्ये हा मानवी मन आणि बुद्धी असे रूढ अर्थाने आपण जर द्वंद्व मानतो त्याबद्दल बोलतो. पुस्तक रंजक आहे,प्रत्येक प्रकरणात तो ताजे संशोधन वापरून ताण कमी-आनंद अधिक वगैरे कसे साधायचे ते सांगतो. ह्या मार्क चे वैशिष्ट्य म्हणजे तो आजच्या पिढीला समजून आहे,त्यामुळे निव्वळ मूल्य आधारित गाप्पा मारण्या ऐवजी तो आजच्या लोकांच्या समस्यांचे मूळ,जसे, entitlement/हक्कभाव वगैरे गुंता सोडवतो.आणि त्यात मग तो स्वतःला,भावना ना -नेमके म्हणजे, मला वाटते ह्याला फार भाव देऊ नये असे सांगतो,म्हणून सटल आर्ट.
ह्याचा पुढचा भाग म्हणजे: सगळे काही गंडलेले आहे/everything is fucked ह्या पुस्तक. सगळे सामाजिक बंध फसलेले आहेत,आणि म्हणून लोकांना हताश-निराश वाटते आहे असे ह्या पुस्तकांचे स्वरूप. आनंद आणि ताण हा विषय आधीच्या पुस्तकातून झालेला असल्याचे शिझेंमिखाईल किंवा डेविड बर्न वगैरे च्या गोष्टी इथे येत नाही. अर्थ,आशा आणि मानवी अस्तित्वात ह्याचे,आपल्याला माहीत नसलेलं मध्यवर्ती स्थान असा।मोठा घास तो घेतो. भावनेची अथांग ताकत पण तिचे अति प्रवाही स्वरूप असे विवेचन 3,4 प्रकरणात करून तो वळतो तो निटशे कडे! मानवाने आपली प्रगती “विचार पूर्वक” केलेली नाहीये त्यामुळे तो संपेल असं काही नितशे म्हणला. आदी मानव ते आता पर्यंत,चुकीचे ओ असेना,काही रीती-मान्यता-पायंडे समजला धरून ठेवत होते,वौज्ञानिक प्रगती वगैरे मुळे ते पटापट पडायला लागलेत आणि त्याजागी नवीन रचना कराचे आपण विसरलो/आता ते जमणार नाही असे ते म्हणतो. पक्षी मानवाला एकत्र धरून ठेवणारा देव,हा देव आपण मारून टाकला आहे, god is dead, आणि त्याच पोकळीत आपण कोसळून पडू/implode. असा संदर्भ manson देतो. ह्या मांडणीचे मर्यादित स्वरूप आणि त्यातून निघणार मार्ग ह्यासाठी तो कान्ट कडे वळतो ! मानवाची अर्थ लावायची क्षमता हीच त्याला मानव बनवते(विचार क्षमता) असे कान्ट म्हणतो. त्यामुळे नुसता उपभोग आणि पश्चाताप असे मानवाचे जग नायसला पाहिजे.त्याही पुढे, फक्त नफा -नुकसान,सुख-भीती असे अगदी व्यवहारी स्वरूप,त्या त्या वेळी योग्य असेल तरी उत्क्रांतीच्या विरुद्ध आहे असे manson म्हणतो. समज विकसित झालेल्या माणसाने व्यवहाराच्या पलीकडे जाऊन मूल्य ह्या आधारावर जगावे असे ती म्हणतो.इथे कान्ट ला सोबत घेऊन मानवाला फक्त माणुसकी हेच तत्व परम असले पाहिजे. त्याने माणूसपण जपत ,ह्या जापण्याला आपले ध्येय (end as opposed to means) मानून जगावे असे तो मांडतो. हे पुस्तक बहुतांश पाश्चात्य लोकसाठी असल्याने,लेखक म्हणून त्याला असे जगता येते का आणि कसे ह्याबद्दल अधिक बोलणे भाग आहे.साधारणतः अश्या पुस्तकात,ह्या वळणावर बुद्ध आणि विपश्यना वगैरे उद्धृत केली जाते.पण गम्मत झाली. मानवी पण हेच मूल्य म्हणून जगत वागावे आणि ते कसे हे सांगताना तो अंतिम नफा लक्षात घेऊ नका आणि प्रेयस असे मूल्य म्हणून मानवी चांगुलपणा अंगीकारात जगा असे सांगतो. Being good for the sake of beging good without the calculation of the benefit,असे काहीसे तो दोन तीन पानात मांडतो. निष्काम कर्मयोग,इतका दणदणीत एखाद्या हिट पुस्तकात मांडलेलं दिसत नाही.

Image credits: mark manson’s website and wikipedia.

Categories
Marathi Misc

Marathi Satire:mumbai bullet train wins UN award

जगातील सर्वोच 6 बुलेट ट्रेन प्रकल्पात मुंबई-आमदावाद बुलेट चा समावेश ! भारतात सर्वत्र जल्लोष!!
(UTI) आत्ताच प्राप्त झालेला वृत्ता नुसार, युनायटेड मोनिटारी बँकेने जाहीर केलेल्या जगातील 6 सर्वोत्तम बुलेट ट्रेन प्रकल्पात भारतातील मुंबई बुलेट प्रकल्पाचा समावेश झालेला आहे.जगातील सगळ्या बुलेट ट्रेन प्रकल्पची यादी करून बँकेने ही यादी जाहीर केलेली आहे.ह्याप्रसंगी बँकेचे प्रमुख गो टू मून म्हणाले “जागतिक पातळीवर विविध देशातील बुलेट प्रकल्पात उत्कृष्ठतेसाठी बंधुभावाने स्पर्धा निर्माण व्हावी ह्यासाठी आम्हि ही यादी तयार केली आहे”. ह्यात जगातील नावाजलेले शिंकनशेंन,जर्मन भान,शघाई मागलेव्ही इत्यादी प्रकल्पात भारतातील मुंबई बुलेट प्रकल्प सहाव्या क्रमांकावर आलेला आहे.
बुलेट ट्रेनची गती,सोयी सुधीवा,तंत्रकौशल्य,वक्तशीरपणा आणि भाडे इत्यादी निकषांवर आधारित गुंतालिका बनवून ही यादी तयार केली आहे.ह्यात सर्वसमावेशकता हे तत्व वापरून पहिल्यांदाचा ग्रीनफिल्ड म्हणजे होऊ घातलेले, अशी एक नवीन श्रेणीतील, एकमेव जागा भारतातील मुंबई ते आमदावाद ह्या विचार अधीन प्रकल्पाने पटकावली.
त्यामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.ह्याप्रसंगी मुबई बुलेट ट्रेन चे व्यवस्थापक सचिन दीक्षित म्हणाले,आमच्या प्रकल्पाचे सद्यास केवळ कुदळ फावडा झाले असले तरी एकंदरीत भु-सम-पांदण, आमदावाद हे श्रीमंत शहर धरावी असलेल्या शहराशी जोडणायची दूरदृष्टी, ह्यात शून्य व्याजावर मिळालेलं जपानी कर्ज इत्यादी प्रस्तावित बाबी आमच्या पदरात हा सन्मान पडण्यास कारणीभूत झाल्या.सोबत मुद्दाम पर्यावरण विषयक म्हणून जे काही कल्पक नियोजन आम्ही करणार आहोत ते नियोजन बघून बँक विशेष खुश झाली.ह्या बुलेट ट्रेनच्या चाकातून निर्माण होणारी उष्मा वापरून आम्ही मार्गातील खारे पाणी उकळून त्यातून मीठ आणि मिनरल वाटर तयार करणार आहोत.सोबत मार्गातील मॅनग्रुव च्या खारफुटीत आम्ही काजव्यांची विशेष शेती करणार आहोत, त्यामुळे सह्यादरीतील काजव्यांची सहल आणि त्यामुळे होणारे निसर्ग ह्रास कमी होईल आणि पुण्यातील निसर्ग प्रेमी खुश होतील.सोबतच बुलेट चे इंटिरियर आम्ही वारली पॅटर्न वर करणार आहोत.गेल्या 600 वर्षात आदिवासींना असे त्रिबूट कुठल्याही प्रकल्पने दिलेले नाही.ह्याच मूळे आमचा प्रकल्प ह्या यादीतील सार्थ विजेता ठरतो.
ह्या घटनेवर आम जनतेची ,आमच्या प्रतिनिधीने जी प्रतिक्रिया घेतली त्या प्रतिक्रिये नुसार लोकांत उत्साहाची एक मस्त लकेर पसरलेली आहे.जागोजागी खादीचे फ्लेक्स उभारले गेले आहेत.त्यात विविध राजकीय पक्ष आपले श्रेय अधोरेखित करीत आहेत.एक पक्षाने तर वसई-विरार खाडीत जगातील सर्वात मोठा खादीचा खाडी फ्लेक्स बनवून त्यावर “करायच्या आधीच दाखवून दिले” असा संदेश दिला आहे.ह्या घटनेची प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटली असून, “माझ्या स्वप्नांत बुलेट ट्रेनची सफर” हे सगळ्यात ट्रेंडिंग फॉरवर्ड ठरलेलं आहे(त्यास पटकन युनो चा पुरस्कार मिळो).
निसर्ग जगतात सुद्धा आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे.त्यामुळे मुंबईतील कोसळधार पाउस आता आपली सामाजिक बांधिलकी समजून सोलापूर ला शिफ्ट झालाय आणि ह्या घटनेला सॉलिडयारीती म्हणून भुसावळ च्या रेल पटारींनी पुढच्या 24 तासासाठी राग (माल)त खडखडाट करायचे ठरवले आहे.एकंदरीत ही घटना भारतासाठी भूषण आहे असे आमचे महान नेते रमता जोगी आज ट्विटर के साथ कार्यक्रमात म्हणाले.इतके अच्छे दिन आल्यामुळे मात्र सगळे विरोधी पक्ष हे खूप दीन झालेत हे मात्र नक्की.

Categories
Marathi Misc

Marathi Letter:आयटी इंजिनियर चे पालकांना न लिहिलेले पत्र

“तू आनंदी का दिसत नाहीस?” – IT मधील नवा प्रश्न, साधारण 28 च्या आसपासचा मुलगा,त्याला IT किंवा तश्याच प्रकारच्या क्षेत्रातील बायको,एखादी परदेशवारी झालेली,कदाचित फ्लॅट बुक केलेला आणि कार पण.ही बहुतेक एकुलती किंवा भाऊ-बहीण एवढाच संसार असलेली मध्यमवर्गीय पोरं.कधीतरी ,पोरगा सेट झाला असे म्हणत म्हणत आईबाबानां काहीतरी चुकल्याचे कळायला लागते आणि शेवटी हा प्रश्न विचारला जातो, तू आनंदी असल्यासारखा का वाटत नाही,सतत तणाव वैगरे.
जिल्ह्या,तालुक्यातून आपला मुलगा इंजिनरिंग किंवा mca करून छान It ला लागला आणि आता लग्न सुद्धा झालेले म्हणून कर्तव्य पूर्ती चे सर्टिफिकेट घेताना हे असे काही नवेच समोर येईल अशी शक्यता त्यांचा गावी नसते.व्यसन किंवा लग्नातील विसंवाद नाहीये हे त्यांना पालक म्हणून कळलेले असते. त्या काकांच्या मुलाला 2008 साली काढले तसे काही आहे का?तुला काम जमत/आवडत नाही का पासून ते बॉस त्रास देतो का,आमची चिंता नको करू पर्यंत सगळे विचारून झालेले असते.त्यात कहर म्हणजे कधी नौकरी वगैरे गेली तर आम्ही सांभाळून घेऊ सुद्धा म्हणून झालेले असते.आणि त्यावेळी आपले नेमके काय विचकलेले आहे हे त्यांना कधीही न सांगण्याचा त्या मुलाचा विचार पक्का झालेला असतो.
ह्या सगळ्या प्रकाराची सुरवात होते ती मुलाने संसार थाटायला सुरवात केली तेव्हा पासून.गरिबीतून घर वर काढले किंवा परिसरात नाव काढले असे माझ्या म्हणजे 2000 च्या आसपास डिग्री झालेला पिढीला असलेले आंतरिक बळ ह्या नवीन पिढीकडे नसते.साधारण लीड पदाला असल्याने ,शर्थ केली तरी इतक्या फास्ट बदलणाऱ्या तंत्र जगात आपण नेहमीच रेलवंट,आचिवर राहूच असे नाही हे कळून चुकले असते .आपण पुण्याच्या किंवा कुठल्या शाहरील दूरच्या उपनगरातील आनेक्स मध्ये घेतलेला फ्लॅट आपल्याला सहज परवडलेला नाही.तसा तो फ्लॅटपण काही खास नाही.आणि आपले घर जसे होते त्याच्या जवळपास सुद्धा तो येत नाही.हे सत्य हळूहळू,एखाद्या काटा रोज थोडा थोडा खोल रुतत जावा तसे उमगलेले असते.त्यात मग मुलाचे कौतुक करायला म्हणून रिसोडहुन मुद्दाम आलेले आजी किंवा आई ह्या फ्लॅट चे दार दिवसभर उघडे ठेवते.पण तरी कोणी येताजाता ‘काय चालले” म्हणून विचारत नाही,नसतेच कुणी,सगळे संध्याकाळी पार्क मध्ये भेटणार असतात.हे तिला जाणवून… पण त्याला जाणवू नये म्हणून ..
काहीतरी कारण काढून ..पटकन गावी परत जाणारी आजी/आई गेली की तो फ्लॅट मुलाच्या मनातून उतरतो.प्रश्न किंमत,अंतर किंवा आकाराचा नसतो.शेजाराचा तर नासतोच नसतो.आपल्या नकळत, विचारात नसताना सुद्धा, घर म्हणून आपले काहीतरी मोघम पण निश्चित असे आराखडे होते हे त्याला अचानक कळलेले असते. ह्यात मग संसार किंवा जीवन म्हणून सुद्धा आपले काही आराखडे होते हे त्यादिवशी कळले तेव्हा मुलगा माणूस झालेला असला तरी भावनिक दृष्टया फासलेला असतो. ठरवून न निवडलेले जीवन आणि माहीत नसलेली आवड ह्यात. कुणी IIM किंवा ग्रीन कार्ड च्या मागे लागलेला असला की तो ह्यातून सुटतो,काही वर्षांसाठी. मुळात एक दोन भावंडं असलेली ही पिढी,लाडकी असली तरी खूप हळवी असतात.आपले छोटे घर,आई-बाबा,शेजार-शाळा ह्यांच्या बद्दल त्यांच्या भावना इतक्या खोलवर असतील ह्याचा अंदाज माझ्या 80 च्या पिढीला जरासा आलेला असला तरी त्यांच्या पालक असलेला 60, 70च्या पिढीला आलेला असतोच असा नाही.घरी फार काही आर्थिक पीळ नसला तर 50 हजार ते लाख भरात पगार असला तरी त्यात “अर्थ” नसतो.तिकडे आई-बाबा मात्र “मस्त एन्जॉय करा बरका” असे ,आपले अपुरे स्वप्न आपले मूल जगतंय म्हणून खुश होतात.कधीतरी फोन करून मुलगा विषय काढतो,हळूच.गावात काही व्यापार असेल तर तिकडे जॉईन करू शकतो मी !किंवा आपल्याकडे काही साधा जॉब असता तर बरे झाले असते नाही?ह्याला इकडे करमत नसते…..
हे बोलताना बरेचदा रागावलेले बायको दिसली तरी तिला नजरंदाज करण्याची हिंमत त्याने केलेली असते.पण बाबाला काही ह्याचे मन समजत नाही.
माझे आता वय म्हणून झालेलं असल्याने साधारण महिन्याला एक तरी कुणी असा विषय घेऊन येतो. “आम्ही येथे खूप काही ग्रेट करत नाही हो,त्यापेक्षा तुमच्या सोबत/जवळ असतो तर बरे होते” हे असे संगायला जमत नाही.लायकीचे ओझे म्हणतात ते हे.
त्यात काही मुलाच्या पालकांना वेळेत अंदाज आला…. तर काहींनी स्पष्ट विषय काढला.बहुतेक पोरं घरी काहीतरी व्यापार,धंदा किंवा स्वतःच काही नेमका प्लॅन असलेले आहेत. आणि सुखी आहेत.फॅक्टरी,स्विमिंग पूल-जिम,ट्युशन,तिकडेच स्टार्टअप ते दुकान/प्रतिष्ठानाचा शाखा विस्तार असे विविध प्रकार केलेत.बायकोची साथ होती मात्र !
ज्यांना हे जमले नाही ते पण सुखीच आहेत पण संधीची वाट बघताहेत. ह्यात मुलींना फारसा चॉईस नसतो,तरी एक म्हणालीच “सर,मला वाटते काही मोठी मंदी, युद्ध व्हावे आणि परत जाता यावे”. हे असे सगळयांचे होते असे माझे म्हणणे नाही,पण हे असे असू शकते ,आपली मुल पैश्यापेक्षा भावनिक स्थिरता,अर्थ असे काही शोधू शकतात आणि त्याला कदाचित हे मांडता येत नाहीत हे पालकांना माहीत पाहिजे.नाहीतरी तुझाकडे सगळे असून आनंदी का दिसत नाहीस ? हा प्रश्न असह्य होऊन अगदी 100 टक्के अस्सल वाटेल असे उत्तर पण वाठवायला शिकेन तो.आता 22 ला असलेली पिढी ते शिकूनच येतेय.त्यांना घर किंवा कार घायचीच नाहीये,एका कंपनीत फार काळ टिकण्या पेक्षा पटापट पैसे घेऊन आपले काही सुरू करणायचे मनसुबे घेऊन आलेले हे फ्रेशर कदाचित जास्त सुखी असतील.पण निव्वळ गरिबीतून आलेलो मी/आम्ही आणि अस्थिरतेवर आरूढ ही नवी फ्रेशर पिढी ह्यामधील संक्रमण काळातील ,आता तिशीला जाणारी पिढी मात्र फसलेली दिसते.मला आवडलेले लहानपण आणि मला पाहिजे असलेले भविष्य हे ह्या इंजिनियर,IT नौकरित नाहीये हे आपल्या पालकांना सांगा रे बाबांनो.अशी घुसमट होत असले तर बोला.नाहीतर हा मेसेज आपल्या काका,मामांना पाठवा ते पोचवतील तुमच्या आई-बाबा पर्यंत.
तुमचा,
दीक्षित दादा.