नवी कविता : दोन नोटातरी द्या मज बदलूनि
_____________________
दोन नोटातरी द्या मज बदलूनि
कामाविल्या ज्या मी स्वकष्टाने
मोडून टाकली सारी वचने
मोदी च्या त्या टांकसाळीने
अशी ब्यांकतरी द्या मजगावी
जुन्या घेऊ ह्या मी बदलूनी
काउंटरी किवा एटीयमी ठेवा
पडेना सोस एवढ्या नोटा
साहेब अठवा आणाभाका
सगळाच गेला धंदा बसुनी
दोन नोटातरी द्या मज बदलूनि
बंदिकाल हा अल्हड स्त्रीसम
मांजरीचे लोणी माकडास वाटा
निजनवीन नियमांच्या पाट्या
काढुनी का लाविता मजघोडा
काळा संपेल कसा सांगातर,का पेटीयमवर?
मित्रांनो नोटा बदलारे
कॅशलेस चा सोस करारे
देशभक्तीची अट टाका रे
लंगोटी कासेची सोडा रे
____________
केशवसुत ह्यांची मूळ कविता : एक तुतारी द्या मज आणुनी
एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समते चा ध्वज उंच धारा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर