Categories
Misc Poems

Marathi poem:दोन डब्बे

​दोन डब्बे झालेत जगाचे…

एकात तू बसला कि, दुसऱ्यात मला बसव

सोबत नसलो तुझ्या ,कि विरोधी असतो मी

वाद सोप्पे झाले आपले,मतांचा अंत झाल्याने||1||

आजकाल मोदी चे असतात डब्बे

त्याआधी केजरीवाल भोवती मंडायचो आपण

मार्क्स,समाजवादी, भांडवलवाले ..

हे बाबा आजोबांचे आवडते डब्बे जुने..पुराणे||2||

बायकोला टोमणे मारणारी नणंद ,हीच

नवऱ्याशी भावा साठी भांडणारी बहीण आपली

द्वयताचे चेंडू सहज असले रोज झेलतो आपण

काळा-गोऱ्याचा पुस्तकी हट्ट येतो रे कुठून?||3||

जिंकण्याचा घोर लागला ..की डब्बे येतात कामी

माझाच डाव,नियम,निवाडा.. सोयीची मांडणी

मुद्द्या ऐवजी, गुद्द्यां साठी जेव्हा मंडशील डाव

डोके गंजते,स्वत्व मरते,डब्बे कबरी होतात आपल्या||4||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.