Categories
Misc Poems

Marathi poem:बदल नोटा

​तुझ्या नोटा माझ्या नोटा

टमरेल रिकामा वापर गोटा

चेक नसेल तर डिजिटल हो

चढवून paytm चा फेटा||1||

तीनशे रुपये रोजंदारी वर

काळा झाला बघ पांढरा

तू असाच लाग रांगेत

नेसून इमानदारीचा सादरा||2||

शोध कुठे सापडतात का

घाबरलेला काळाबाजारी

दुय्यम निबंधक,आरटीओ

गुंठामंत्री अन रेतीव्यापारी||3||

लिस्ट अशी ही लांब आहे

तुझ्या मनातील काळ्यांची

सगळे कसे सुटलेत मात्र

भोके मोठी होती जाळ्यांची||4||

असा नको घाबरू मर्दा

लुच्चे होते ते अच्छे आले

हेच ते दीन,बघ बदललेत

60 टक्क्यांवर सच्चे झाले||5||

तुला तरी कोठे होती

हिम्मत जग बदलायची

आता जग बदलले तुझे

कर घाई नोटा बदलायची||6||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.