Categories
Misc Write Ups and Downs

जयललिता : इंदिरा नंतर ह्याच

विधान सभेत , फक्त बलात्कार व्हायचा बाकी होता,काका म्हणले .जनरल नॉलेज साठी पेपर वाचणे सुरु केले होते १९८९ ला, जयललिता सोबत हे असे झाले ,म्हणजे नेमके काय हे कळायचे वय नव्हते .

विधानसभेतून बाहेर येणाऱ्या जयललिता (एक्सप्रेस फोटो)
विधानसभेतून बाहेर येणाऱ्या जयललिता (एक्सप्रेस फोटो)

आमच्या महान नेत्यावर टीका करणारी कोण हि, संपवा हिला , हि प्रवृत्ती आजही कायम आहेच .पण एक स्त्री च्या अब्रूवर भर विधान सभेत असा असा प्रसंग झाल्याचा हा एकमेव (सुदैवाने) ,प्रकार असावा . तेव्हा ह्या घटनेवर stand घेतलेला आठवते का हो ?किबहुना , जयललिता गेल्या म्हणूनच बर्याच लोकांना हे असे काही घडले हे माहित झाले,असो . तर मग येईन परत ते मुख्यमंत्री बनूनच , आणि हि बाई ,खरच ६ महिन्यांनी मुख्यमंत्री बनून सभेत आली , तमिळ मध्यामंनी द्रौपदी वगेरे म्हणून ह्यांचा गौरव पण केला .प्रकरण तिथे थांबले नही .मग 2001 च्या आसपास असाच प्रसंग करुणानिधी आणि मुरासोली मारण ह्यांच्यावर आला .सत्तेत होत्या जयललिता .लुंगी पडून ,चड्डी दिसेल , असे खेचत आणले होते पोलिसांनी ,सगळे tv वरती live. स्त्री चा संताप वैगरे म्हणून आपण कवी-कौतुक करू शकतो.पण बाईंनी हिसाब-बराबर केला .
जयललिता समोर पाठीतून वाकणारे आमदार खासदार ह्यांच्या फोटो वर आपण बरेचदा सहज कॉम्मेंट करतो.पण भारतीय राजकारण स्त्री ला ती स्त्री असण्याचा विसर कसा पडू देत नही त्याचे हे उदाहरण. ते इतरांनीही लक्षात ठेवावे असा कदाचित जयललिता ह्यांचा निर्धार असावा .त्यांचे राजकारण वगेरे चर्चेचा विषय ठरावा , पण इंदिरा गांधी नंन्तर इतकी शक्ती शाली राजकारणी-स्त्री म्हणजे जयललिता . हे लक्षात घ्या.

बरे हे इथेच संपत नही ,सिंगूर च्या वेळी ,कॉंग्रेसच्या प्रियरंजन दासमुंशी च्या जवळ रडतांना च्या ममता बनेर्जी सगळ्यांना आठवतात, पुन्हा तेच ….आमच्या महान नेत्या विरुद्ध… तिथून ममता ज्या उठल्या ते मुख्यमंत्री बनूनच.

म्हणूच ,स्मृती इराणीला ,भर लोकसभेत ,आम्हाला माहित आहे तू कोण आहेस ते , असे यादव म्हणतात ,त्याचे पुढे काय होईल …बघुयात .
पण एकंदरीत ,महिला-मध्यम-आपली जागरूकता ह्यांचे आडाखे ध्वस्त होतील असे हे प्रसंग .जयललिता त्याला पुरून उरल्या.एक ५ वर्ष जावूद्या …इंदिरा नंतर ह्याच,जयललिता

note: Image is copyright of Indian Express ,shared here with thanks to them .
Original: http://www.loksatta.com/desh-videsh-news/jayalalithaa-saree-torn-in-tamil-nadu-assembely-indian-express-photographer-1356093/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.