कसे काय ,ते,मग असे कसे ?
मला वाटते ,जसे तसे ,अन तसे तसे
मी वाचलेले ,वाचविलेले, तेच खरे
असे सारे आज व्यक्त झाले..
मी माझ्या असण्याचा, तू तुझ्या
त्या सोहळ्याचे गीत मोडून
संचिताचीे,मननाची,वाट सोडून
विचाराच्या जोखडातून मुक्त झाले
शोधा संवादा साठी कुणी,तर
वादविवादावर सारे लुब्ध झाले
हरवलेत कुठे रे माझे सुहृद?
आपले सोडून सारे भक्त झाले