Categories
Misc Write Ups and Downs

Deool : Marathi movie review

” डिप्रेशन म्हणजे काय?” समजा अचानक तुमच्या लहान मुलाने तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुमची की अवस्था होईल ? . उत्तर देऊ कि नको आणि देऊ तर नेमके काय सांगावे अशी अवघड अवस्था होऊन जावी .निरागस प्रश्न किती भेदक होऊ शकतात ह्याचे ते उदाहरण .

 

देउळ चित्रपट बघतांना आपले पण असेच काही होते . म्हणायला   गावात नव्याने बांधल्या जाणाऱ्या देवळाची काय ती  गोष्ट  . पण त्या अनुषंगाने गाव , तेथील लोक , देव आणि देवाबद्दल आपली श्रद्धा ह्या सर्वांबद्दल निरागस पण मुलभूत प्रश्न हा चित्रपट मांडून जातो . हे प्रश्न आणि त्यांची   मनातल्या मनात देलीली आपली उत्तरे हेच या चित्रपटाचे अनुभव वैशिष्ट्य !आणि हा प्रवास ज्याचा त्याचा वेगळा , त्यामुळे वैचारिक दुर्ष्टीने हा सिनेमा प्रत्येकाला वेगवेगळा रुचेल .पण मनोरंजन म्हणून देउळ अगदी झकास आणि नेमका . ग्रामीण भाग आणि विकास ह्यांची दिशा व दशा ह्यावर देउळ कुठलाहि वैचारिक आव न आणता खूप काही  सुचवून जातो पण दर्शकांनी त्या सर्वांची नोंद घ्यावीच म्हणून चित्रपटला जडपण येऊ देत नाही .

 

 

ग्रामीण चित्रपट म्हणजे अगदी बावळट आणि धांदरट  व्यक्ती किवां अतिशय गरीब लोक  , शिवराळ भाषा ह्या प्रकारचा  सरधोपट चित्रण देउळ करत नाही . चित्रपटातील पत्रे  माफक इंग्रजी शब्द वापरतात ,मोबाईलहि  वापरतात आणि त्यांची Ringtone सुद्धा काळागणिक बदलते , किंबहुना हा आणि ह्या सारख्या कित्येक बारीक-सारीक दैनंदिन गोष्टीतून डायरेक्टर आपल्याला सिनेमा तील पत्रांत होणारा बदल सांगून जातो .   ह्या चित्रपटाची संहिता , दिग्दर्शन वगेरे बाबी नेमक्या किती चांगल्या आहेंत हे आपल्याला जाणकारांकडून विविध माध्यमातून कळेलच . पण एक दर्शक म्हणून देउळ हा चित्रपट खूप सहज (Natural)  वाटतो .

 

 

ग्रामीण मराठी जीवन हे रंजक , स्वाभाविक आणि मार्मिक पणे कसे सांगावे ह्याचा आदर्श दादा कोंडके मांडून गेलेत . चावटपना सोडला तर देउळ अगदी त्या (उच्च) दर्जाचा आहे आणि हो मनोरंजक सुद्धा !  . ह्या चित्रपटाला व्यावसाईक यश आणि भरपूर अवार्ड मिळावेत हीच दत्ता चरणी प्रार्थना !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.