Marathi poem:दोन डब्बे

​दोन डब्बे झालेत जगाचे… एकात तू बसला कि, दुसऱ्यात मला बसव सोबत नसलो तुझ्या ,कि विरोधी असतो मी वाद सोप्पे झाले आपले,मतांचा अंत झाल्याने||1|| आजकाल मोदी चे असतात डब्बे त्याआधी केजरीवाल भोवती मंडायचो आपण मार्क्स,समाजवादी, भांडवलवाले .. हे बाबा आजोबांचे आवडते डब्बे जुने..पुराणे||2|| बायकोला टोमणे मारणारी नणंद ,हीच नवऱ्याशी भावा साठी भांडणारी बहीण आपली द्वयताचे […]

Marathi poem:बदल नोटा

​तुझ्या नोटा माझ्या नोटा टमरेल रिकामा वापर गोटा चेक नसेल तर डिजिटल हो चढवून paytm चा फेटा||1|| तीनशे रुपये रोजंदारी वर काळा झाला बघ पांढरा तू असाच लाग रांगेत नेसून इमानदारीचा सादरा||2|| शोध कुठे सापडतात का घाबरलेला काळाबाजारी दुय्यम निबंधक,आरटीओ गुंठामंत्री अन रेतीव्यापारी||3|| लिस्ट अशी ही लांब आहे तुझ्या मनातील काळ्यांची सगळे कसे सुटलेत मात्र […]

जयललिता : इंदिरा नंतर ह्याच

विधान सभेत , फक्त बलात्कार व्हायचा बाकी होता,काका म्हणले .जनरल नॉलेज साठी पेपर वाचणे सुरु केले होते १९८९ ला, जयललिता सोबत हे असे झाले ,म्हणजे नेमके काय हे कळायचे वय नव्हते . आमच्या महान नेत्यावर टीका करणारी कोण हि, संपवा हिला , हि प्रवृत्ती आजही कायम आहेच .पण एक स्त्री च्या अब्रूवर भर विधान सभेत […]

Marathi poem:अहो विश्वम्भर

​अहो विश्वाम्भर, किती भराभर,तेच तेच बोलणार जड मोदी च्या बरोबरीने,हलका अरविंद तोलनार तुम्हालाही माहित आहे,नेता आहे हा खमका एकटाच इथवर आलाय,थेट आणि नेमका हट्टी, खंबीर, हुकूमशहा,एकाच रंगाचे शेड आहे यातील फरक कळणार कसा,मीडिया आजकाल पेड आहे तुम्ही करा काय तो विवेक, बनून विचारवंत विचारधारेचा हट्ट सोडून,बोलाल काहो स्वतंत्र? कालचे उत्तर,उद्या कदाचित,चुकीचेहि ठरेल शाही च आहे […]

Marathi poem:देवेंद्र

​देवेंद्र लागला मुरायला नाथ हा झुरायला पालवी खुडायला धीर साथ देईल का.. हाकरेs कळत नाही ओले असून जळत नाही सामना हा जमेल का मुंबई जिंकायला मुठी काही वळत नाही पंजा सळसळत नाही पप्पू मुभा देईल का शिलेदारांना लढायला नाही म्हणायला राणे आहे बारामतीचे गाणे आहे अजून पाणी वाहील का धरणे भरायला नोटांवर असू दे बंदी […]

Marathi poem:सोशल मीडिया

  ह्याची ट्रिप,त्याचे मत आणि उसने नवल वारंवार कुठे किती.. काय होते,माझे जीवन नीरस फार..! वेळ दवडून, वेळच नसतो,भेटू कधीतरी म्हणशील संतापाला आवतन देऊन,असा किती दिवस झुरशील?   बघ अजूनही ,चंद्र उगवत असेल, मंद,आकाशात मित्रांना घेऊन,जमव मैफिल,led च्या प्रकाशात टक्कल पडायला लागलीत,विकेट पडायच्या आधी भेट नुसतेच हैप्पी ब्दडॆ, असे किती दिवस म्हणशील?   गेली ती […]

Marathi poem:भक्त झाले

​कसे काय ,ते,मग असे कसे ? मला वाटते ,जसे तसे ,अन तसे तसे मी वाचलेले ,वाचविलेले, तेच खरे असे सारे आज व्यक्त झाले.. मी माझ्या असण्याचा, तू तुझ्या त्या सोहळ्याचे गीत मोडून संचिताचीे,मननाची,वाट सोडून विचाराच्या जोखडातून मुक्त झाले शोधा  संवादा साठी कुणी,तर वादविवादावर  सारे  लुब्ध झाले हरवलेत कुठे रे माझे सुहृद? आपले सोडून सारे भक्त […]

marathi poem:उगवशील तू

हे बिंब आसमानी, मनी विराणी,ओठांवर ओळी विसळू कश्या मी गाशील तू,तेच गीत नव्याने,ध्यानाचे मनी ठेवशील तू पदरात रक्षा वागवू कशा मी,उसळून येईल धग त्यातूनही हसशील तू,नटशील तू,नव्याने कलेवर सजवशील तू तुझ्या डोळ्यात बिंब कोणाचे,पापण्यातील स्वप्ने आवरू कसे मी उगवशील तू,बहरशील तू, पंख्याने स्वप्ने सुकवशील तू माझ्या या रात्री,चंद्र दाह उराशी,पुन्हा पोर्णिमेत उजळू कसा मी उजवशील […]