Categories
Misc Poems

Marathi poem:कळपातील कण्हनं


तुज्या तोंडी दुसऱ्यांचे तर्क

तुझा शब्द,त्यांचे वर्ख

असा कसा व्यक्त होतोस..

इतक्या स्वस्तात भक्त होतोस?||1||

त्यांनी सांगीतले तू मानले

असे होते,तसे होते

असेच होत असते मग..

आणि तसेच असते जग||2||
इतके सहज कसे मानतो

कल्लोळाला सूर जाणतो?

आपले गुंडाळून ठेवून

प्रचाराला विचार म्हणतो||3||
असे आवडत असेल तर कर..

फेकतील तुझ्यावर ओळी

तेच,तसेच,पण नव्याने रोज

ती आपले म्हणून डोक्यात भर||4||
मला सांग मित्रा एक..

पण सांग, त्या आधी तुला..

वदवून घेतलेले पटेल का

आपलेसे तरी वाटेल का?||5||
तू म्हणशील तर हो म्हणेन मी

मैत्रीच्या नात्या पायी

तुझे म्हणणे,तुझेच खरेच

तू असाच ,हे पण मानेन मी..||6||
मग तू ,तू तरी कुठे उरशील

 नकळत कळपात शिरशील

काळापात कोठे शोधू मी मित्र

एकांडा वाघ .. कळपातील कण्हनं…||7||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.