Marathi poem:सोशल मीडिया

 

ह्याची ट्रिप,त्याचे मत आणि उसने नवल वारंवार

कुठे किती.. काय होते,माझे जीवन नीरस फार..!

वेळ दवडून, वेळच नसतो,भेटू कधीतरी म्हणशील

संतापाला आवतन देऊन,असा किती दिवस झुरशील?
 

बघ अजूनही ,चंद्र उगवत असेल, मंद,आकाशात

मित्रांना घेऊन,जमव मैफिल,led च्या प्रकाशात

टक्कल पडायला लागलीत,विकेट पडायच्या आधी भेट

नुसतेच हैप्पी ब्दडॆ, असे किती दिवस म्हणशील?
 

गेली ती वेळ,आणि जातंय ते जीवन तुझेच आहे

तो तुझा जिवलगा,तिकडे असाच बिझी आहे

जा त्याला भेट कडाडून,बंद कर साल्या हे नेट

गेलेला काळ तुच असतो,असा किती दिवस उरशील

 

जीवनाच्या भेगा भरायला,अधून मधून,अपडेट भक्षण

प्रत्यक्षाची भूक आभासाने?वेड्याचे नाहींका हे लक्षण

तोंडी लावायला लोक असतात का?किती खाडे करशील

सोशल असली,तरी मीडिया असते,अजून किती भुलशील?