Marathi poem:शरीर विकतो आम्ही

​शरीर विकतोय आम्ही

थंड एसी मध्ये बसून..

कीबोर्ड वर बोटे..

खुर्चीत बसून मान..।।1।।
बॉस सोबत मिटिंग ला

त्यांनी म्हटलं बस..

कि लगेच वाकतो .

कणे पण विकतो आम्ही..।।2।।
इंनोवेशन करतो आम्ही

जग बदलायला.. भल्यासाठी

भ्रमात राहायला..नोटासाठी

डोके पण विकतो आम्ही..।।3।।
2bhk च्या कुंटनखाण्यात

स्वतःचीच दलाली खातो

स्वप्नांचे भोग देऊन रोज…

आत्मा पण विकतो आम्ही।।4।।