Marathi poem:देवेंद्र

​देवेंद्र लागला मुरायला

नाथ हा झुरायला

पालवी खुडायला

धीर साथ देईल का..
हाकरेs कळत नाही

ओले असून जळत नाही

सामना हा जमेल का

मुंबई जिंकायला
मुठी काही वळत नाही

पंजा सळसळत नाही

पप्पू मुभा देईल का

शिलेदारांना लढायला
नाही म्हणायला राणे आहे

बारामतीचे गाणे आहे

अजून पाणी वाहील का

धरणे भरायला
नोटांवर असू दे बंदी

बाजारात कितीही मंदी

मी दिल्लीचा रुपया

माझीच असणार चांदी