Marathi poem:तुझी जात,माझी जात

​एक जात तुझी,एक जात माझी

एक लाथ तुझी एक लाथ माझी।।1।।

एकजात नव्हतो,एकसाथ असून

एक बात तुझी,एक बात माझी।।2।।

गळाभेट करून,गळा कापाकापी

एक चाल तुझी,एक चाल माझी।।3।।

सर्वसमभाव,भावकीलाच पाव

एक मोट तुझी,एक मोट माझी।।4।।

तुझी जागा पक्की,माझीही नक्की

एक वाट तुझी,एक वाट माझी।।5।।

एकोप्याच्या गाप्पा, दोघेही मारू

एक रात तुझी,एक रात माझी।।6।।

दोघेहि महान,दोघेही समान.. पण

एक जात तुझी,एक जात माझी।।7।।