Marathi poem:कोमेजले जिव्हाळे

​पुरवू कसे डोहाळे, उबदार हिवाळ्याचे

कोमेजले जिव्हाळे,धुमसून वात गेली…1
तू गात होतीस तिकडे, किशोरीचे ताराने

व्हाट्सअँप पायी,विसुरन बात गेली..2
बंगला सोन्याचा हा,बांधला तुझ्याच साठी

अडवे झालो आपण,निद्रेची साथ गेली..3
ठेवले तुझ्या पायी,जग जिंकून सारे

सुखाच्या हिशेबात,सगळीच रात गेली..4
उरलो कितीसे आपण,झुरता साथि साठी

हे कोण अनोळखी,सोडून कात गेली..5
टीप:2 मध्ये wahtsapp पायी ऐवजी गुंतलो माझ्यात मी असे सार्वकालिक योग्य ठरले असते,पण सध्या तरी wahtsapp जास्त नेमके वाटते