Marathi poem:अहो विश्वम्भर

​अहो विश्वाम्भर, किती भराभर,तेच तेच बोलणार

जड मोदी च्या बरोबरीने,हलका अरविंद तोलनार

तुम्हालाही माहित आहे,नेता आहे हा खमका

एकटाच इथवर आलाय,थेट आणि नेमका
हट्टी, खंबीर, हुकूमशहा,एकाच रंगाचे शेड आहे

यातील फरक कळणार कसा,मीडिया आजकाल पेड आहे

तुम्ही करा काय तो विवेक, बनून विचारवंत

विचारधारेचा हट्ट सोडून,बोलाल काहो स्वतंत्र?
कालचे उत्तर,उद्या कदाचित,चुकीचेहि ठरेल

शाही च आहे ही,लोकांची,करेल अन मग भरेल

दरम्यान,केलेल्या निवडीची,समजून सांगा किंमत

म्हणजे नव्याने भुलण्याची कायम राहील हिम्मत