Marathi poem:अरे हो धर्म

​अरे हो,धर्म..नाही का..

आकाशातून आला..होता कोणी

माणसाच्या भल्या साठी..

जीवनाचे सार सांगितले..

रोजचे व्यवहार सांगितले

सांगितले माणसांवर प्रेमकरा

सगळ्यांवर सेम करा..

अश्या छान छान गोष्टी होत्या

महान ..महान व्यक्ती होत्या

धर्मच तो चुकणार.. कसा?

तुझा म्हटल्यावर झुकणार कसा..

त्या धर्मात पटतो कारे मी?

माझा मी ,सगळा असतो,म्हणून विचारले

माणूस म्हणून दिसतो का मी?

काही,वेगळा आहे ,म्हणून विचारले

तुज्या धर्मात असते का

माझ्या धर्मासाहित माझी किंमत..

पटले नाही तर बदलायची

परवडते का रे हिम्मत….

बघ बाबा विचार कर..

तुझ्या जन्मापासूनचा हा धर्म आहे

मी बोललो म्हणून भटकू नको

तुज्या असण्याचा तो मर्म आहे..

शेवटी आकाशातून आला होता कुणी

तुझ्या माझ्या भल्या साठी

त्यांनी सांगितलेले, जे तुला सांगितले आहे

बरोबरच असणार ते,आपल्या भल्यासाठी

प्रश्न पडला म्हणून,धर्म पडताळायचा नसतो

आपण समजून घ्यायचेे,वर्म चाळायचा नसतो